Wednesday 13 September 2017

saral suchana 1093

सरल महत्वाचे :
सूचना क्रमांक : १०९३
दिनांक : १३/०९/२०१७

(महत्वाची सूचना आहे,सर्वांना share करावी ही विनंती )
प्रदीप भोसले,हवेली,पुणे
______________
➡ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया बाबत महत्वाचे ______________

➡ जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये काही दुरुस्ती/बदल करण्यात आलेला असून त्यासंबंधी शासन निर्णय (शासन निर्णय क्रमांक 201708281801438020) देखील शासनाच्या संकेतस्थळावर काल उपलब्ध करून देण्यात आलेला आहे,हे लक्षात घ्यावे

➡ सर्व शिक्षक बांधवांना सूचित करण्यात येत आहे की,जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया मधील विशेष संवर्ग-३ (अवघड क्षेत्रातील बदली अधिकार प्राप्त कर्मचारी) ला फॉर्म भरण्यासाठी उद्या दुपारी 2 वाजेपासून लॉगिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.या सुविधेअंतर्गत जे अवघड क्षेत्रातील शिक्षक बदली अधिकार पात्र आहेत अशाच शिक्षकांनी आपला फॉर्म भरावा.बदली अधिकार पात्र नसताना हेतुपुरस्कार फॉर्म भरून सदर सुविधेचा लाभ घेणाऱ्या अर्जदारावर कठोर कारवाई केली जाणार असल्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.

➡ संवर्ग-३ अंतर्गत फॉर्म कोण भरू शकतो?

जे कर्मचारी सध्या अवघड क्षेत्रात कार्यरत आहे व ज्यांची अवघड क्षेत्रात एकूण सलग सेवा ३ वर्षे वा त्यापेक्षा अधिक झालेली आहे असे कर्मचारी संवर्ग-३ चा फॉर्म भरू शकतात.

➡ विशेष संवर्ग १ व २ या संवर्गातील बदली साठी अर्ज केलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया पार पडलेली असून बदली झालेल्या शिक्षकांची यादी ही संवर्ग ३ तसेच संवर्ग-४ ची बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिन द्वारे सर्व संवर्गासह एकत्रित प्रदर्शित करण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.

➡ ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नाही अशा जिल्ह्यांसाठी लवकरच संवर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना बदली साठीचा फॉर्म online भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.सोप्या क्षेत्रातील संवर्ग-४ मधील कर्मचाऱ्यांना संवर्ग-३ च्या कर्मचाऱ्याची बदली प्रक्रिया झाल्यावर online फॉर्म भरण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

➡ समाणिकरणाअंतर्गत शाळेमध्ये रिक्त ठेवावयाच्या पदावर जर कर्मचारी काम करत असेल तर अशा शाळेतील अतिरिक्त बदलीपात्र कर्मचाऱ्याला देखील संवर्ग-४ मध्ये फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे हे लक्षात घ्यावे.म्हणजेच समाणिकरणाची प्रक्रिया देखील online प्रणालीच्या माध्यमातून करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे हे लक्षात घ्यावे.

➡ बदली प्रक्रिया बाबत whatsapp सारख्या सोशल माध्यमातून अनेक अफवा पसरवल्या जात असून बदली बाबत अर्थहीन तर्क-वितर्क लावले जात असल्याचे दिसून येत आहे.मित्रानो,अशा अफवांना बळी न पडता शासन निर्णयाचा (सुधारित निर्णयासह),दिलेल्या मॅन्युअलचा अभ्यास करून त्याप्रमाणे फॉर्म भरण्याची कार्यवाही करावी.अफवांवर विश्वास ठेवून आपण फॉर्म भरल्यानंतर बदली प्रक्रियांमध्ये काही अडचण निर्माण झाल्यास यासाठी आपण स्वतः जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.

➡ संवर्ग-३ व ४ च्या कर्मचाऱ्यांना बदलीसाठीचा फॉर्म कसा भरावा यासाठीचे मॅन्युअल आज संध्याकाळी आमच्या pradeepbhosale.blogspot.in या ब्लॉगला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.तसेच सदर मॅन्युअल हे राज्यस्तरीय व्हाट्सअप्प ग्रुपच्या माध्यमातुन देखील सर्वाना share करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

➡ तसेच फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर फॉर्म भरत असताना काही अडचण निर्माण झाल्यास अर्जदार शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याद्वारे आपल्या समस्येचे निराकरण करून घेण्याचा सूचना देखील वरिष्ठ स्तरावरून देण्यात आलेल्या आहेत.

➡ जिल्हाअंतर्गत बदली संदर्भात ग्रामविकास मंत्रालयाद्वारे गुरुवार दिनांक 14/09/2017 रोजी VC चे आयोजन करण्यात आलेले आहे.GR बद्दल व पुढील नियोजनाबद्दल अधिक सविस्तर माहिती त्या ठिकाणी देण्यात येईलच.

➡ राज्यस्तरीय whatsapp सरल ग्रुपचे सदस्य होण्यासाठी पुढील लिंक वर क्लीक करा आणि सदर फॉर्म भरा.

                               लिंक
                        *goo.gl/j9nFGk*

अधिक माहितीसाठी आमच्या pradeepbhosale.blogspot.in  या ब्लॉग ला भेट द्या.

धन्यवाद
प्रदीप भोसले
हवेली,पुणे
Mobile no. :9404683229
(Dont call,only whatsapp message)
Email: egov.saral@gmail.com
Blog: pradeepbhosale.blogspot.in

 Disclaimer : _सदर पोस्ट ही केवळ आपणास मार्गदर्शनपर आहे हे लक्षात घ्यावे.या पोस्ट मधील सूचना म्हणजे  वरिष्ठ कार्यालयाकडून अचूक मार्गदर्शन मिळवून ते आपणापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला गेला आहे.परंतु आमच्याकडून ऐकण्याच्या व समजून घेण्याच्या प्रक्रियेत सदर माहितीमध्ये अचूकतेच्या दृष्टीने थोडाफार फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद घ्यावी.अशा केस मध्ये मी यासाठी कायदेशीररित्या जबाबदार नसेल याची नोंद घ्यावी.सदर माहिती आपल्या शिक्षक बांधवांचे काम लवकर व्हावे यासाठी केवळ वैयक्तिक स्तरावरून केलेले मार्गदर्शन असून सदर पोस्ट म्हणजे शासकीय कार्यालयाकडून आलेला आदेश नाही याची नोंद घ्यावी.

No comments:

Post a Comment