Wednesday 13 September 2017

नमस्कार मित्रांनो, पायाभूत चाचणी गुणदान विषयी असलेल्या शंका-समाधान

👉 कोणता विद्यार्थी प्रगत समजावा ?
👉 कोणता वर्ग प्रगत आणि कोणती शाळा प्रगत समजावी

〰〰〰〰〰〰〰〰〰

🙏 यासाठी शालेय शिक्षण विभागाचा 14 जुलै 2017 शासन निर्णयानुसार

👉  पायाभूत चाचणी मध्ये मूलभूत क्षमता व मागील इयत्तेच्या क्षमता असे प्रश्न आले आहेत
➖➖➖➖➖➖➖➖➖
 👉 भाषा विषयात वाचन व लेखन या मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्नांच्या एकूण गुणांच्या किमान 75% गुण व एकूण पेपरच्या गुणांच्या 60%  गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत समजावा
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 गणित विषयात संख्याज्ञान , बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार या मूलभूत क्षमतेवर आधारित एकूण प्रश्नांच्या गुणांच्या 75% गुण घेणारे व एकूण पेपरच्या गुणांच्या 60%  गुण मिळवणारा विद्यार्थी प्रगत समजावा
➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 इंग्रजी व विज्ञान विषयात फक्त एकूण गुणांच्या 60% गुण मिळविणारे विध्यार्थी प्रगत समजावे.

👉 वर्गातील सर्व विद्यार्थी प्रगत असतील तर तो वर्ग प्रगत समजावा व शाळेतील सर्व वर्ग प्रगत असतील तर ती शाळा प्रगत समजावी

➖➖➖➖➖➖➖➖➖
👉 भाषा विषयांचे वर्गनिहाय मूलभूत क्षमतेवर आधारित प्रश्न संख्या DIECPD पनवेल यांनी तयार केलेली PDF सोबत पाठवत आहे, त्याप्रमाणे गुणदान करा.

➖➖➖➖➖➖➖➖➖

👉 गणित विषयाच्या संदर्भात आपण क्षमतानिहाय प्रश्न व गुण निश्चित करून गुणदान करावे

➖➖➖➖➖➖➖➖➖

काही शंका असल्यास जरून संपर्क साधा

➖➖➖➖➖➖➖➖➖

🙏 आपलाच 👉
      श्री.खोसे उमेश
     📞 7972959686

No comments:

Post a Comment